प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाटची मान उंचावणारे वीर जवान महेश विठ्ठलराव गंधारे यांनी भारतीय सैन्य दलात कश्मीर, आसाम, लदाख, अंदमान, निकोबार, पंजाब, गुजरात, राजस्थान अशा विविध ठिकाणी देशासाठी मोलाची कामगिरी बजावून १९ वर्ष भारत देशाचे रक्षण करून भारतीय सेनेतून दिनांक ०४ मार्च २०२४ ला सेवा निवृत्त झाल्या नंतर जन्मगाव हिंगणघाट येथे आले असता शहरातील स्वागत मिरवणूक काढण्यात आली.
प्रसंगी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी स्वागत करुन कारंजा चौक येथील अमर जवान ज्योतीला तसेच जयस्तंभला पुष्पचक्र अर्पण करून राष्ट्रगीत गायन करून सलामी देऊन सेवानिवृत्त महेश गंधारे व त्यांच्या परिवाराला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी तसेच पोलिस अधिकारी, माजी आमदार राजु तिमांडे, माजी नगरसेवक अनिल भोंगाडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे अमोल बोरकर सह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वागत केले.