सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांची तक्रार, सुरक्षा अधिकारी म्हणतात चौकशी सुरू आहे.
अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला दि.१३:- राज्य परिवहन महामंडळ अकोला विभागातील प्रशासन शाखेचा ई-मेल हॅक करून मुंबई मध्यवर्ती कार्यालयातून प्राप्त झालेली गोपनीय माहिती , नोकरी संदर्भातील नेमणूक, कार्यालयाने दिलेले आर्थिक व्यवहार संबंधीचे आदेश, प्रशासकीय आदेश इत्यादी माहिती चोरून आलेल्या आदेशातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून आर्थिक देवाण-घेवाण वर काम करून देण्याची हमी देऊन अशा प्रकारचे काम करणाऱ्या रॅकेट मधील कर्मचाऱ्यांची तक्रार अकोला येथील एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यां बाबत तक्रार अकोला येथील सामाजिक कार्यकर्ते श्री उमेश इंगळे यांनी मुंबई येथे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांच्याकडे केली होती.
त्या अनुषंगाने मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांचे आदेशानुसार सुरक्षा व दक्षता अधिकारी अकोला यांनी प्रशासन शाखेमध्ये छापा टाकून संगणक, टी डी व इतर साहित्य जप्त करून चौकशी केली असता प्रशासन शाखेतील तीन ते चार कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर प्रशासनाच्या मेल आयडी सोबत जोडले असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशी माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेली आहे त्या शाखेतील हे कर्मचारी मागील कित्येक वर्षापासून एकाच शाखेत कार्यरत असल्यामुळे बऱ्याच कालावधीपासून गोपनीय माहिती चोरून आर्थिक उलाढाल करीत असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे हे कर्मचारी आज रोजी स्थानिक प्रशासनावर राजकीय दबाव तंत्राचा व मुंबई कार्यालयातील युनियन पुढाऱ्यांचा दबाव टाकून चौकशीमध्ये अडथळा आणू शकतात त्यामुळे चौकशी निष्पक्ष होण्यासाठी दोषी कर्मचाऱ्यांची त्वरित प्रशासकीय कारणास्तव विभागीय कार्यालयाच्या इमारतीतून किंवा जिथे गोपनीय बाबींचा संबंध येत नाही किंवा महत्त्वाच्या प्रशासकीय बाबींचा संबंध येत नाहीअशा ठिकाणी किंवा बाहेरील आगारात त्वरीत बदली करण्यात यावीअसा सूर कर्मचाऱ्यांमध्ये निघत आहे.
प्रशासनाची गोपनीय माहिती चोरून प्रशासनाला व इतर कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या अशा कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करून त्यांची इतरत्र बदली करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता तथा तक्रारकर्ते उमेश इंगळे हे प्रशासनाला करणार आहे.

