सामाजिक वनिकरण परीक्षेत्र राजुरा तर्फे पर्यावरण मार्गदर्शन व “चला जाणु या वनाला” उपक्रम संपन्न.
संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 7 मार्च:- सामाजिक वनिकरण परीक्षेत्र राजुरा च्या वतीने पर्यावरण मार्गदर्शन व पर्यावरण संबंधित गोष्टी जाणून घेण्याकरिता प्रत्येक वनपरीक्षेत्राच्या मार्फत हरित सेना पथक म्हणून नियुक्त केलेल्या प्रत्येक तालुक्यातील पाच शाळाच्या विध्यार्थीना जंगलामध्ये नेऊन “चला जाणुया वनाला” उपक्रमा अंतर्गत नेचर कॅम्प पार पडला.
राजुरा तालुक्यातील शिवाजी हायस्कुल राजुरा व पांढरपोवनी या शाळेतील अनुक्रमे 32 विध्यार्थी व 5 शिक्षक, आणी 30 विध्यार्थी व 3 शिक्षकांनी सहभाग घेऊन हिरव्या रंगाची टोपी व टी शर्ट परिधान करून वनभ्रमंती, पक्षी निरीक्षण, वन्यजीव प्राणी निरीक्षण, पर्यावरण अभ्यास व नोंदी करून रोपवाटीकेला भेट दिली.
राजुरा वनपरीक्षेत्रातील जोगापूर जंगल परिसरात सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत वनभ्रमंती करून जंगलातील बारकावे टिपत वाघाच्या पाऊलखुणा, अस्वल गुहा ओळख, पक्षीओळख, वृक्षलागवड व संगोपन यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी देविदास भोयर, वज्रमाला बोलमवार, मंगेश सर्जेकर यांनी विध्यार्थीना मार्गदर्शन केले. सामाजिक वनिकरण राजुराचे वनपाल सुनील मेश्राम, लिपिक दीपक मेश्राम व इतर वनकर्मचारी तसेच शिवाजी हायस्कुल चे मुख्याध्यापक देविदास भोयर, आशिष नलगे, प्रदीप कोवे, हर्षा बतकमवार, सय्यद अन्वर, सुभाष किन्नाके, अर्चना मडावी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.