देवेंद्र सिरसाट, हिंगणा नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणा:- तालुक्यातील जुनेवाणी येथे दिनांक ८ मार्च ला जागतिक महिला दिन वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. गावातील महिला बचत गटांच्या वतीने विशेष कार्यक्रमाये आयोजन प्राथमिक शाळा जूनेवाणी येथील प्रांगणात करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
सकाळी सर्व प्रथम गावातील साफ सफाई करून गावात प्रभात फेरी काढण्यात आली, त्या नंतर महिलांना स्वावलंबी बनवण्याबाबत जनजागृती करण्यात आली. मोबाईल फोन बाबत होणाऱ्या दुष्परिणाम बाबद नाटक तयार करून जन जागृती करणारे हे नाटक विशेष लक्षवेधी ठरले, महिला दिना निमित्त आदिवासी नृत्त्य व गायन सुध्दा या वेळी सादर करण्यात आले, काही महिलांनी भारुडाचे सादरीकरण केले, विशेष म्हणजे वृध्द महिलांना शाल श्रीफळ देवुन त्यांच्या सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी गट ग्राम पंचायत जूनेवाणीचे सरपंच चिंदुजी फटींग व उपसरपंच, तसेच सर्व ग्राम पंचायत सदस्य प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तर एलआयसी हिंगणा शाखेचे शाखा प्रबंधक सुधाकर मेश्राम, विकास अधिकारी राष्ट्रपाल कांबळे, एलआयसी अभिकर्ति प्रवीण घवघवे उपस्थित होते. यावेळी शाळेच्या शिक्षिका उमाटे ताई यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे व महिलांचे आभार मानले.