जालना जिल्हा वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे यांची मागणी.
रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके हे जालना तालुक्यातील मजरेवाडी येथे वंचित बहुजन आघाडीचे शाखा उद्घाटनासाठी गेले असता. तेथील काही गावगुंडांनी दीपक डोके व त्यांचे सहकारी यांच्यावर हल्ला केला यामध्ये दीपक डोके व त्यांचे सहकारी जखमी झाले. यामध्ये दीपक डोके यांच्या गाडी फोडण्यात आली आणि गाडीचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले. याच गोष्टीचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडी परतूर तालुक्याच्या वतीने परतूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
जालना तालुक्यातील मजरेवाडी येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे व आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे वंचित बहुजन आघाडी परतूर तालुक्याच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे, बीड जिल्हा संघटक धम्मानंद साळवे, बीड जिल्हा सचिव अंकुश जाधव, ज्येष्ठ नेते चोखाजी सौंदर्य, ज्येष्ठ नेते सूर्मासिंग जुनी, तालुका सदस्य अजर पटेल हे उपस्थीत होते.