उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्हातील वाडेगाव येथे झालेल्या अपघातात बाळापूर येथील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे मृतकाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात शेख सादिक वय 45 वर्ष, शेख खालिद वय 40 वर्ष, शेख माजीद वय 24 वर्ष यांचा मृत्यू झाला.
या दुःखाच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी मृतक तरुणाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मदतीचा धनादेश दिला. स्वतःच्या वतीने 20 हजार रुपये यावेळी दिले. आणी सरकारकडून जी काही मदत होईल ती त्वरित देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व सर्व अल्पसंख्याक पदाधिकारी उपस्थित होते.