आशिष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील रेल्वे मार्गावर कवाडघाट येथे पुलाच्या पेंटिंगचे काम सुरू आहे. रविवारी सायंकाळी याठिकाणी पेंटिंग करणाऱ्या दोन मजुरांचा पुलावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. एका मजुराचा घटनास्थळी मृत्यू झाला तर दुसऱ्यास वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा सेवाग्राम रुग्णालयाच्या गेटवरच तडफडून मृत्यू झाला. विजय शर्मा व फिरोज खान अशी मृतांची नावे आहेत. मृतक हे राजस्थान येथील असल्याची माहिती मिळून आली आहे.
हिंगणघाट येथे पुलाच्या पेंटिंगचे काम सुरू असताना कंत्राटदार मार्फत कामगारांना सुरक्षेचे साधन उपलब्ध करून देणे गरजेचे होते पण कंत्राटदार यांनी या कामगारांना कुठलेही सुरक्षा साधने पुरविली नाही. त्यामुळे या अपघातात दोन कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या कामगाराचा मृत्यू झाल्याचे या कंत्राटदार याला समजताच तो कामगाराच्या कुटुंबाला मदत करण्याचे सोडून देऊन तो पळून गेला चंदन बेंदे असे या कंत्राटदाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन मजूर पुलाच्या पेंटिंगचे काम सुरू पडून मृत्यु झाला त्यामुळे या मजुराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका मजुराला गंभीर स्थितीत रात्री रुग्णालयात दाखल करण्यास आले असतांना परिसराचे गेट उघडण्यात आले नाही. पाच तासांनी गेट उघडले तेव्हा वेळ निघून गेली होती. तडफडून त्याचा मृत्यू झाला. ते पाहून संबंधित रेल्वे कंत्राटदार चंदन बेंदे याने पळ काढला. हा परिवार राजस्थान येथील आहे. पडल्याने त्यांचा मोबाईल पण फुटला. त्यामुळे संबंधित लोकांना कळविणे शक्य होत नसल्याचे येथे उपस्थित समाजसेवक मंगेश भुते यांनी सांगितले.
अन्य कामासाठी आलेले एक पोलीस शिपाई म्हणाले की हा कंत्राटदार प्रतिसाद देत नाही. त्याने त्याचा मोबाईल बंद करून ठेवला आहे. उपाय नसल्याचे ते म्हणाले. निरक्षर असल्याने तसेच बोली कळत नसल्याने पुढे काय करायचे त्याबाबत सर्व चिंताग्रस्त दिसून येत होते. या परिवारास कोणी मदत मिळवून देणार का, असा प्रश्न उपस्थित केल्या जातो. कारण शव विच्छेदन किटसाठी पण पैसे नसल्याने सर्व थांबले होते.

