हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- शहरात दि 17 मार्च 2024 रविवार ला भारतीय बौद्ध महासभा जिल्हा चंद्रपूर पश्चिम विभागाच्या अंतर्गत बल्लारपूर शहर शाखा च्या वतीने दी 17 ते 26 मार्च 2924 या 10 दिवसीय “धम्म उपासक व उपासिका प्रशिक्षण शिबिर” आम्रपाली बुद्ध विहार गौरक्षण वार्ड, (सातखोली) बल्लारपूर येथे प्रारम्भ करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रथमता तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना व तथागतांचा मूर्तीला पुष्पहार व फुले अर्पण करून अगरबत्ती व मोमबत्ती प्रज्वलित करून कृष्णक पेरकावार सर केंद्रीय शिक्षक तथा बौद्धाचार्य यानी उपस्थिताना त्रिशरण पंचशील ग्रहण करून करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व पाहुण्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर इंजी.नेताजी भरणे जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा यांनी मोमबत्ती प्रज्वलित करून शिबिराचे उद्घाटन केले.
आजच्या परिस्थितीमध्ये अशा धम्म शिबिराची आवश्यकता आहे, याबद्दल मार्गदर्शन केले व उपस्थित सर्व बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्यात. यानंतर या शिबिराला प्रमुख्याने उपस्थित असलेल्या सुजाताताई लाटकर केंद्रेय शिक्षिका तथा जिल्हा उपाध्यक्ष महिला विभाग कृष्णक पेरकावार जिल्हा सचिव तथा केंद्रीय शिक्षक, किशोर तेलतुंबड़े चंद्रपूर शहर सरचिटणीस तथा केंद्रीय शिक्षक, धरमुजी नगराळे अध्यक्ष राजुरा तालुका, गौतम चौरे, अजय चौहान सामाजिक कार्यकर्ते बल्लारपुर या शिबिराच्या मार्गदर्शिका प्रगती ताई मेश्राम केंद्रीय शिक्षिका या सर्वांनी शिबिराला मोलाचे मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्यात.
या शिबिराच्या अध्यक्ष व बल्लारपुर शहर शाखेच्या अध्यक्षा व केंद्रीय शिक्षिका गायत्री रामटेके यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना बल्लारपूर शहरातील भारतीय बौद्ध महासभेच्या कार्याची माहिती दिली आणि बल्लारपुर शहरातील बंधु भागिनिनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या धम्म शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
आजच्या या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमा चे उत्कृष्ट संचालन पंचशीला वेले केंद्रीय शिक्षिका यांनी केले, तर प्रस्ताविक खोब्रागडे मैडम यानी केले तर आभार प्रदर्शन अनुकला वाघमारे जिल्हा सचिव महिला विभाग तथा केंद्रीय शिक्षिका यांनी मानले. हे शिबिर यशस्वी करण्याकरिता भारतीय बौद्ध महासभा बल्लारपुर शहर शाखेचे सर्व पदाधिकारी तसेच आम्रपाली महिला मंडल गोरक्षण वार्ड यानी अथक परिश्रम घेत आहेत. या शिबिराला बल्लारपूर शहरातील महिलांची खूप मोठ्या संख्येने उपस्थिती होती.