अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील निसर्ग साथी फाउंडेशन, हिंगणघाट तालुक्यात निसर्ग, पशु, पक्षी संवर्धनार्थ कार्यरत असून निसर्ग साथी फाउंडेशन ने आनलाईन निवडणूक घेतली. यात शाळा, महाविद्यालय, जेष्ठ नागरिक यांनी सहभाग घेऊन ‘चिमणी’ ची निवड केली. हिंगणघाट तालुक्यात ‘चिमणी’ या पक्षाची निवड करणारे हिंगणघाट शहर हे राज्यातील पहिले शहर आहे. तालुक्यात चिमणी च्या संवर्धनासाठी निसर्ग साथी फाउंडेशन प्रयत्नशील आहे. येत्या २० तारखेला जागतिक चिमणी दिवस आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी शहरातील शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक यांच्या करीता शहरातील आंतरराष्ट्रीय चित्रकार हरिहर पेंदे यांचे द्वारकामाई निवासस्थानी चिमणी शिल्प कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी या कार्यशाळेत चित्रकार हरिहर पेंदे यांचे मार्गदर्शनाखाली ५० विद्यार्थ्यांनी चिमणी चे सुबक शिल्प तयार केले आहे. उत्कृष्ट तिन चिमणी शिल्पांना जागतिक चिमणी दिवस निमित्ताने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत शहरातील भारत विद्यालय, एस एस एम विद्यालय, रत्नविद्या निकेतन, नवकेतन विद्यालय जामणी, संजय गांधी विद्या निकेतन, महेश ज्ञानपीठ, जी बी एम एम विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
चिमणी शिल्प कार्यशाळा आयोजित करण्यासाठी निसर्ग साथी फाउंडेशन चे अध्यक्ष प्रविण कडू, प्राचार्य डॉ. बालाजी राजूरकर, नियाजुद्दीन सिद्दीकी, प्रभाकर कोळसे, प्रा. सुलभा कडु, राजश्री विरुळकर, चैतन्य वावधने, यशवंत गडवार, मनोज गायधने, अमोल मुनेश्वर, अरविंद दहापुते, किशोर उकेकर, प्रविण गंडाईत, मिलिंद सावरकर, शाम मेघरे, हेमंत कुळकर्णी, दिपाली सावरकर, योगेश्वर कलोडे, वासुदेव पडवे, श्रुती सोरटे आदीनी परिश्रम घेतले.