अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर, 18 मार्च:- बार काऊसिंल ऑफ महाराष्ट्र अँण्ड गोवा व सावनेर बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने 17 मार्चला भालेराव विज्ञान महाविद्यालय येथे नागपुर जिल्हातील बारा तालुक्यातील वकीलासाठी एक दिवसीय विधी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकमाचे उदघाटन न्यायमुर्ती नितीन सांभरे, न्यायाधिश मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपिठ यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यकमाची प्रस्तावना अँड. पारिजात पांडे अध्यक्ष बार काऊसिंल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी केली. त्यानी बार काऊसिंल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वतीने नागपुर जिल्हातील सावनेर, कळमेश्वर, उमरेड, काटोल, रामटेक, कुही, मौदा, कामठी व इतर तालुकातील 140 हुन अधिक वकीलांसाठी सखोल ज्ञान व कायदयातील नव्या बदलांची माहिती देण्यात आली. यावेळी बार असोसिएशनच्या वतीने भविष्यातही असे कार्यक्रम राबवून अशीच माहिती सर्वांना देऊ अशी यावेळी सांगितले.
सदर प्रकारचे वकीलासाठी एक दिवसीय विधी प्रशिक्षण आयोजन हे पहील्यांदाच होत असुन त्याचा सर्व वकीलानी भविष्यात सुध्दा लाभ घ्यावा ही विनंती केली. तसेच सावनेर बार असोसियेशनच्या अध्यक्षा अँड. पल्लवी मुलमुले यांनी सर्व बार सदस्या मार्फत न्यायमुर्ती यांचे स्वागत वकीलांचे कुटुंबप्रमुख म्हणुन तालुक्यातील सर्वसामान्य वकीलांच्या समस्या सांगीतल्या.
यावेळी न्यायमुर्ती नितीन सांभरे यांनी आपल्या उदघाटन भाषणात कायदा हा गणीता सारखा नसतो. कारण कायदा हा समाजाच्या गरजानुसार बदलत असतो करीता प्रत्येक वकीलाने नविन कायद्याचा सखोल अभ्यास करून आपल्या पक्षकारांना न्यायालयातुन न्याय मिळवुन देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. तसेच पहिलांदा तालुकास्तरीय वकीलांसाठी कार्यक्रम आयोजन केला याकरीता काऊसिंल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे अभिनंदन केले.
मुंबई उच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील अँड.सुदीप पासबोला यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 भारतीय न्याय संहिता 2023 आणि भारतीय साक्ष्य अधिनियम 2023 चे फायदे व तोटे व त्यामुळे वकीली क्षेत्रात कोणकोणते बदल व कोणती तय्यारी करावी लागेल तसेच सदर नविन कायदा हा योग्यपणे वापरला तर पक्षकारांसाठी लवकर न्यायाची हमी देऊ शकतो असा विश्वास प्रकट केला. त्याचप्रमाणे अँड. संदीप शास्त्री यांनी सुध्दा विकीपत्र व अन्य दस्ताऐवज तयार करतांना वकीलांनी कोणती खबरदारी घ्यावी याबदल मागदर्शन केले. वकीलांने पक्षकारांच्या गरजा ओळखुन तयार केलेला एक योग्य करारनामा भविष्यात होणारी केसेस व मनस्ताप वाचवु शकतो असे सांगीतले.
या कार्यक्रमाचे यशस्वी संचलन अँड. शैलेष जैन यांनी तर आभार प्रदर्शन अँड.युवराज बागडे अध्यक्ष कळमेश्वर बार असोसियेशन यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बारा तालुक्यातील आलेले वकीलांचे स्वागत व आभार अँड. मनोजकुमार खंगारे यांनी मानले. हा कार्यक्रमाचे सफल आयोजनासाठी बार अध्यक्षा अँड.पल्लवी मुलमुले, उपाध्यक्ष अँड.चंद्रकांत पिसे, सचिव अँड.पुरे, अँड.अरूण निंबाळकर, अँड.माधुरी चौधरी, अँड.उषा पवार, अँड ठावरे, अँड संजय शर्मा, अँड.श्रीकांत पांडे, अँड गोंडुळे, अँड.भोजराज सोमकुवर व इतर तालुका वकील संघाचे सदस्यांचे आभार मानले.