प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- लवकरच लोकशाहीचा महाकुंभ म्हणजेच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आघाडी युक्ती करत असून उमेदवार घोषित करत आहे तर काही पक्ष वेट फॉर वॉच करत आहे. त्यात लोकसभा निवडणुका संदर्भात राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे.
महाराष्ट्रात भाजपाने आपली 20 उमेदवाराची घोषणा करत आघाडी घेतली आहे. पण महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना ठाकरे पक्षाने मोट बाधलेल्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा गदारोळ अजून संपलेला नसल्याचे अधिकृत उमेदवार अजूनही निश्चित झालेले नाहीत.
अशातच मात्र राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत असून यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील संभाव्य उमेदवारांची यादी हाती आली आहे. शरद पवार यांच्या गटाकडून येत्या लोकसभा निवडणुकीत कोणाला संधी दिली जाऊ शकते याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघ हा मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस कडे होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वाट्याला आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेवर प्रा. नितेश कराळे मास्तर यांना संधी दिली जाऊ शकते अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने बासिंग बांधून असलेल्या अनेक नेत्यांना धक्का बसणार असल्याचे दिसून येणार अशी चर्चा संपूर्ण जिल्हात आहे.