श्री जय भवानी माता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची हिंगणघाट नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी.
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी चिपकविण्यात येणाऱ्या पाॅम्पलेट विरोधात अत्यंत कठोरपणे दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन श्री जय भवानी माता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने हिंगणघाट नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
हिंगणघाट शहरातील विविध सार्वजनिक ठिकाण जसे बसस्थानक, रेल्वे स्टेशन, विविध चौक, तहसील कार्यालय, सर्व सरकारी इमारती व वैयक्तिक प्रतिष्ठानच्या ठिकाणी विनापरवानगीने अवैधरित्या विविध बाबींचे जाहिरातीचे पाॅम्पलेट चिपकविण्यात येत असतात. एकावर एक असे कितीतरी पाॅम्पलेट चिपकवुन ती जागा विद्रुप करण्यात येत असते. परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने पाॅम्पलेट चिपकविनारे अत्यंत निर्ढावलेले आहेत.
यामुळे करोडो रुपये खर्च करून शासनाच्या व आपल्या “स्वच्छ हिंगणघाट सुंदर हिंगणघाट” या हिंगणघाट शहराला सुंदर करण्याच्या योजनेचा/उपक्रमाचा पार बट्ट्याबोळ झालेला दिसत आहे. अशा अवैध पाॅम्पलेट चिपकविणा-यांच्या विरोधात अतिशय कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक, पर्यावरण, वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या व हिंगणघाट शहर स्वच्छ व सुंदर असावं आणि दिसावं ही सात्विक भावना घेऊन कार्य करणाऱ्या श्री जय भवानी माता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मुख्याधिकारी, नगर परिषद हिंगणघाट यांना करण्यात आली.
यावेळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने प्रशासकीय अधिकारी डबडगे, शिंदे, विशाल ब्राम्हणकर व प्रविण काळे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मनाई फलकसह, संबंधितांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी संस्थेच्या वतीने यापूर्वी सुद्धा याबाबत निवेदन दिले असून त्यावर नगर परिषद हिंगणघाट कडुन कुठलीही कारवाई केली नाही याकडे लक्ष वेधून आतातरी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी करण्यात आली. यावेळी निवेदन देतांना सार्वजनिक ठिकाणी, चौकात व नगर परिषदेच्या वतीने सुशोभिकरण केलेल्या जागी कशा रीतीने विद्रुपीकरण करण्यात आले हे फोटोसहीत निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी निवेदन देतांना संस्थेचे गुणवंत ठाकरे, किरण शिवणकर, अशोक डेकाटे, धनराज कुंभारे, नरेंद्र मानकर, उमेश डेकाटे, सचिन ऐलकुंचेवार, योगेश बाकरे, मयुर बासनवार, कार्तिक काटकर इत्यादी सदस्य उपस्थित होते.