अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २० मार्च:- पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकारांच्या लेखनिमुळे समाजातील रडखडलेले कामे अति जलद गतीने पूर्ण होण्यास मदत मिळते. डॉक्टर व पत्रकार समाजाच्या विकासाचे मुख्य घटक असुन त्यांनी सुद्धा आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष आय.एम.ए डॉ.विलास मानकर यांनी केले. ते आय.एम.ए हॉल सावनेर येथे स्नेह मिलन सोहळ्याप्रसंगी उपस्थितितांना संबोधतांना बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी मंचावर उपाध्यक्ष डॉ. स्मिता भूडे, सचिव डॉ.अमित बाहेती, डॉ.शिवम पुण्यानीं, डॉ. परेश झोपे, डॉ.आशिष चांडक, डॉ.विजय धोटे, डॉ.उमेश जीवतोडे, डॉ.प्रवीण चव्हाण, डॉ. निलेश कुंभारे, डॉ.चंद्रकांत मानकर, डॉ.विजय धोटे, डॉ. अशोक घटे, डॉ.विनोद बोकडे, डॉ. करुणा बोकडे, डॉ.श्वेता चव्हाण यांची उपस्थिती होती.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढुंडूले, बाबा टेकाडे, दीपक कटारे, तेजसिंग सावजी, निलेश पटे, अनिल अडकिने, योगेश पाटील, बंडू दिवटे, मनोहर घोडसे, विजय पांडे, रितेश पाटील, पियुष झुंजूवाडिया सह अनेक पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. यावेळी पत्रकारांनी पुढील वाटचाली करिता आय.एम.ए.च्या नवनियुक्त कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या.