प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राज्य सरकार आणि केंद्र सरकारने सर्वांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून अनेक योजना सुरू केल्या पण त्यायोजना मिळण्यासाठी स्थापन केलेले रुग्णालय मात्र भगवान भरोसे असल्याची स्थिती दिसून येत आहे.
वर्धा जिल्हातील पुलगाव ग्रामीण रुग्णालयाची हे एका नर्सच्या भरोशावर भगवान भरोसे सुरू आहे वास्तविक पाहता पुलगावचे जनसंख्या जवळपास 50 ते 60 हजार आहे व आजूबाजूचे खेडे सुद्धा पुलगाव ग्रामीणला अटॅच आहे व 35 ते 40 खाटेचा हॉस्पिटल आणि वर्धनी चा दर्जा दिला आहे येथे डॉक्टर नसल्यामुळे पेशंटला वर्धा किंवा सावंगी रेफर केल्या जात आहे. एखादा पुलगाव किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये मध्ये अपघात झाला तर रुग्णाची सळर सावंगी किंवा वर्धेला जावं लागेल का असा प्रश्न निर्माण होत आहे.
अशातच विदर्भ प्रमुख भीम आर्मीच्या अंकुश कोचे यांनी ग्रामीण रुग्णालयाला रात्रीचे दहा वाजता ग्रामीण रुग्णालयाला ताला लावण्यात आला असून येथे लवकरात लवकर डॉक्टरची उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे. अशातच आता कोणी राजकीय पक्षाचे नेते किंवा पुढारी या ग्रामीण रुग्णालयासाठी कोणत्या आंदोलन करेल का आता फक्त लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लक्ष लागलेले आहे फक्त मत मागण्यासाठी तुमच्याकडे येणार आहे पण ग्रामीण रुग्णालयावर लक्ष देणार का वर्धा येथे मेडिकल अधिकारी यांना फोन केले असता मी डॉक्टर पाठवतो व दोन डॉक्टर पुलगाव ग्रामीण रुग्णालयात आले असता ते दोन्हीही डॉक्टर मद्यपान अवस्थेत दिसून आल्याने पुलगाव पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला अशातच भीम आर्मीचे विदर्भ प्रमुख अंकुश भाऊ कोचे यांनी राजकीय पुढार्यांना विचारणा केली आहे.