मंगेश जगताप मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- शिवसेना उबाठा पक्षाच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची पहिल्या यादीत जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत आज आपण उबाठा शिवसेना पक्षाचे लोकसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार नेमके कोण आहेत, कोणत्या संभाव्य जागा उबाठा शिवसेनेला दिल्या जाणार आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत.
शिवसेना पक्षाच्या मुख्यपत्र असलेल्या सामन्यातून आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या लोकसभा उमेदवाराची पहिल्या यादीत जाहीर करण्यात आली. या पहिल्या यादीत 16 उमेदवाराचे नाव आहे.
राज्यात महाविकास आघाडीमध्ये एकजूट राहावी आणि जागावाटप पूर्ण झाल्यानंतर विविध आघाड्यांवर निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यात यावी याबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये विस्तृत चर्चा झाली असल्याची माहितीही समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात भाजप विरोधात काय रणनीती असावी? यासोबतच राज्यात लोकसभेसाठी संयुक्त प्रचाराचा धडाका सुरू करण्याचं नियोजनसुद्धा या बैठकीत झाल्याचं कळत आहे.
हे आहे शिवसेना ठाकरेंचे उमेदवार
1 दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ : विद्यमान खासदार अरविंद सावंत 2 उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ : अमोल किर्तीकर 3 उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघ : संजय दीना पाटील 4 दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : अनिल देसाई 5 रायगड लोकसभा मतदारसंघ : अनंत गीते 6 रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ : विनायक राऊत 7 ठाणे लोकसभा मतदारसंघ : राजन विचारे 8 धाराशिव लोकसभा मतदारसंघ : ओमराजे निंबाळकर 9 परभणी लोकसभा मतदारसंघ : संजय जाधव 10 सांगली लोकसभा मतदारसंघ : चंद्रहार पाटील 11 मावळ लोकसभा मतदारसंघ : संजय वाघोरे 12 शिर्डी लोकसभा मतदारसंघ : भाऊसाहेब वाकचौरे 13 बुलढाणा लोकसभा मतदारसंघ : नरेंद्र खेडेकर 14 हिंगोली लोकसभा मतदारसंघ : नागेश पाटील आष्टेकर 15 छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ : चंद्रकांत खैरे 16 यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ : संजय देशमुख