पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- मानवी मनुष्याच्या व्यक्तीमत्व विकास जडणघडणीत वाचनाचे अनन्यसाधारण महत्व असते. पुस्तक वाचनामुळे नवीन गोष्टींची माहिती मिळते, विचार करण्याच्या आणि समजुन घेण्याच्या क्षमतेवर सकारात्मक परीणाम होतो. वाचनातुन यशस्वी व्यक्तींच्या जीवनकथा, त्यांचा संघर्ष, समस्या समजुन घेण्याची व संघर्षातुन व्यक्ती बाहेर पडुन सकारात्मक जिवन जगु शकते, या बाबी समजुन घेण्यास मदत होते.
त्यानुसार कारागृहातील बंद्यांना देखील शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, साहित्यिक इत्यादी क्षेत्रातील प्रसिध्द पुस्तके संगणकावर पीडीएफ स्वरुपात वाचण्यासाठी उपलब्ध व्हावीत, यादृष्टीने येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये e-Library ” सुरु करण्यात आली आहे. सदर ई-लायब्ररीचे उद्घाटन दि.२० मार्च रोजी श्री. एम. के. महाजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजीनगर पुणे यांचे शुभहस्ते व श्रीमती. एस. पी. पोंक्षे अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे, श्रीमती. सोनल पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे, श्री. शैलेश बलकवडे (भा. पो. से) अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे यांचे उपस्थितीत झाले. सदर ई-लायब्ररीमध्ये विविध पुस्तके पीडीएफ स्वरुपात संगणकावर बंद्यांना वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
कारागृहातील बंद्यांसाठी ” e-Library” हा उपक्रम श्री. अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य पुणे, डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकल्पनेतून व श्रीमती. स्वाती साठे कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. सदर उपक्रमामुळे बंद्यांमध्ये सकारात्मक भावना वृध्दींगत होण्यास निश्चितच मदत होणार आहे.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी श्री. सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे डॉ. भाईदास ढोले, उपअधीक्षक श्रीमती. पी. पी. कदम श्री. आर. ई गायकवाड, उपअधीक्षक, श्री. एम. एच. जगताप, उपअधीक्षक, श्री. आनंदा एस कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, श्री. सी. आर सांगळे, बांधकाम तुरुंगााधिकारी, श्री. शिवाजी पाटील, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२, श्री. अगंद गव्हाणे, शिक्षक, श्री. ए. बी. गुंगे, सुभेदार यांनी कामकाज पाहीले.