अनिल अडकिने नागपुर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २८ मार्च:- रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या न्याय, शौर्य आणि सामरिक कुशाग्र बुद्धिमत्तेचे लोकराजे होते. त्याचे प्रजेसाठी त्याच्या परोपकाराची आणि त्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी त्यानी प्रयत्न करत आपले राज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सावनेर येथील शिवसेना कार्यालयात शिवसेना जिल्हा प्रमुख उत्तम भाऊ कापसे यांच्या नेतृत्वात व युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रफुलभाऊ कापसे यांच्या मार्गदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज्यांची जयंती (तिथीनुसार) उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित डॉ.प्रशांत भगत सर, रामभाऊ घाटोडे, अनिरुद्ध बोराडे, प्रशांत कामोने, चेतन हेलोंडे, कपिल पांडे, हिमांशू सिंग, राज चक्रवर्ती, सुशांत सार्वे, सुनिल पारवे आणि समस्त शिवसैनिक उपस्थित होते.