प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि. 01 एप्रिल:- हिंगणघाट पोलीस विभागाच्या वतीने अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर धडक कारवाई करत लाखो रुपयांचा माल जप्त केला आहे. यात दोन आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिसाना मुखबीरकडुन मिळालेल्या माहिती वरून वृश्टी जैन (भापोसे) प्रभारी ठाणेदार पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन गुन्हे प्रगटीकरणचे पथकाने शास्त्री वार्ड हिंगणघाट येथे नाकेबंदी करून नमुद आरोपीतांना पकडुन त्यांना पो. स्टाॅफचा व पंचाचा परिचय देवुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव धिरज गजानन साळवे वय 19 वर्ष, श्रीकांत बाबाराव डफ वय 24 वर्ष दोन्ही रा.शास्त्री वार्ड, हिंगणघाट असे सांगीतल्याने त्यांचे ताब्यातील मोपेड गाडीची पाहणी केली असता आरोपीतांचे मोपेड गाडीवर 04 खर्डाचे खोक्यामध्ये प्रिमियम नं. 1 कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 400 शिश्या मिळुन आल्याने आरोपी क्र. 02 याचे घराची घरझडती घेतली असता आरोपी क्र. 2 याचे घरामध्ये 04 खर्डाचे खोक्यामध्ये प्रिमियम नं. 1 कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 400 शिश्या असा एकुण 800 शिश्या प्रती शिषी 100 रूपये प्रमाणे 80 हजार रुपये व मोपेड गाडी क्र. एम एच 32 ए यु. 0571 जुनि वापरती अंदाजे किं. 70 हजार रुपये असा एकुण जु. किं. 1,50,000/- रू. चा माल मिळुन आल्याने सदरचा माल मौका जप्ती पंचनाम्या प्रमाणे जप्त करून नमुद आरोपी विरूध्द गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कारवाई नुरूल हसन पोलीस अधिक्षक वर्धा, डाॅ. सागर कवडे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, रोशन पंडीत उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांचे मार्गदर्शाखाली वृश्टी जैन (भापोसे) प्रभारी ठाणेदार पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देषानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो. हवा. प्रविण देशमुख, सुनिल मळणकर, पो. ना. नितीन ताराचंदी, नरेंद्र आरेकर, पो.षि. विजय हारनुर यांनी केली आहे.