मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चामोर्शी:- नुकत्याच जाहीर झालेल्या नवोदय प्रवेश परीक्षेच्या निकालात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कुनघाडा रै पंचायत समिती चामोर्शीच्या विद्यार्थिनींनी सलग 4 च्या यशस्वी हॅट्रिक नंतर यावर्षी 5 विद्यार्थिनींनी नवोदय विद्यालयात प्रवेश निश्चित केलेला आहे. अक्षरा विजय दूधबावरे, आराध्या प्रवेश मेश्राम, खुशी नीलकंठ टिकले, समृद्धी रवींद्र कुनघाडकर, क्रिष्टी श्रीनिवास बंडमवार असे या विद्यार्थीनीचे नाव आहे.
नवोदय प्रवेश परीक्षेच्या निकालात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कुनघाडा रै ची 2019 पासून नव्या जोमाने आणि नव्या जोशाने सुरू झालेली यशाची परंपरा या वर्षीही कायम आहे. मागील सलग चार वर्ष चार विद्यार्थिनींची हॅटट्रिक आणि या वर्षी आपलाच विक्रम मोडून 5 विद्यार्थिनींची निवड झालेली आहें हे विशेष.
कुठल्याही परीक्षेत यश मिळवणे सोपे असते पण ते यश टिकवून ठेवणे कठीण असते सत्राच्या सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी ज्यादा सराव नवोदयचे जादा वर्ग, रात्र कालीन वर्ग, पहाटेच्या गृहभेटी, पुरक मार्गदर्शन, प्रत्येक आठवड्यात चाचणी, प्रत्येक आठवड्यात सराव परीक्षा, विविध शैक्षणिक व्हिडिओ, माता पालकांचे मार्गदर्शनपर सत्र, घरोघरी रात्रीच्या गृहभेटी इत्यादी उपक्रमामुळेच हे यश प्राप्त झालेले आहे.
2019 ते आजपर्यंत अश्या एकूण ५ शैक्षणिक सत्रात एकूण १८ मुलींची यशाला गवसणी घातली आहे. सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात गायत्री महावीर गव्हारे, मनीषा सुरेश वासेकर, धनश्री रामचंद्र काटवे संस्कृती हंसराज दुधे यांनी बाजी मारली होती.
सन 2021-22 या शैक्षणिक सत्रात संस्कृती गणेश दुधबळे, उन्नती देवानंद बांबोळे, पौर्णिमा नामदेव नैताम गोजिरी जगन्नाथ चौधरी तर सन 2020-21 या शैक्षणिक सत्रात अपूर्वा संतोष गव्हारे, ज्ञानी किशोर कुकडे, अंशीता संतोष वडेट्टीवार, विशाखा विजय कुकडे सन 2019-20 या शैक्षणिक सत्रात पूजा सूर्यभान वाघाडे
यांनी स्थान पटकावले होते. यावेळी सुद्धा शाळेने यशाची परंपरा कायम राखत आपले 5 स्थान निश्चित केले आहेत.
या यशाचे श्रेय विद्यार्थिनींनी वर्गशिक्षक निमाई मंडल सर, रोशन बागडे सर, गौतम गेडाम सर, मुख्याध्यापक गोटामी सर, वर्षा गौरकर मॅडम, कु.रेखा हटनागर मॅडम , प्रीती नवघडे मॅडम, विलास मेश्राम सर यांना दिले आहे. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्र म्हस्के, केंद्रप्रमुख गोमासे सर आणि संपूर्ण शाळा व्यवस्थापन समितीने मुलींच्या या यशाचे भरभरून कौतुक केले आहे .