पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सुराबर्डी येथील अपारंपरिक प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या एसआरपीएफच्या जवानाने तणावातून एसएलआर रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण नागपुर हादरले आहे. ही घटना शनिवारी दिनांक 6 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास समोर आली आहे. या मंगेश मस्की वय 35 वर्ष असे मृतक जवानाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो एसआरपीएफच्या ग्रुप चारचा कर्मचारी होता. सध्या तो सुराबर्डी येथील अपारंपरिक प्रशिक्षण केंद्राच्या (युओटीसी) मुख्य प्रवेशद्वारावर कार्यरत होता. आज सायंकाळी तो प्रवेशद्वारावर असलेल्या केबिनमध्ये एकटा बसला होता. दरम्यान अचानक गोळीचा आवाज झाल्याने आजूबाजूचे सर्वच कर्मचारी धावत आले यावेळी ही घटना समोर आली आहे.
आत्महत्या केलेल्या मंगेशने रायफल मानेखाली ठेवून गोळी झाडली. गोळी डोक्यातून आरपार बाहेर निघाली. त्यामुळे जागीच मंगेशचा मृत्यू झाला. वाडी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश तटकरे ताफ्यासह दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. दरम्यान मंगेशने नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली ते कळू शकले नाही. ही घटना समोर येताच संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहे.