हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:_ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदावर धर्मुजी नगराळे निवड करण्यात आली असल्याने समाजात आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे.त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देऊन सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या आणि राष्ट्रीय संवरक्षीका महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव यं आंबेडकर असलेल्या भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा ( पश्चिम ) कार्यकारिणीचे शनिवारला दीक्षाभूमी येथे पुनर्गठन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष केंद्रीय शाखा तसेच स्टाफ ऑफिसर समता सैनिक दल एस.के.भंडारे, राष्ट्रीय संघटक पद्माकर गणवीर, राज्याचे अध्यक्ष भिकाजी कांबळे,अशोक घोटेकर विदर्भ प्रदेश अध्यक्ष, नेताजी भरणे माजी जिल्हाध्यक्ष, किशोर तेलतुंबडे जिल्हाध्यक्ष यांचे प्रमुख उपस्थितीत धर्मुजी नगराळे यांना भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष आणि प्रा. दिनेश घागरगुंडे सर यांना संघटक राजुरा तालुका म्हणून निवड करण्यात आली.
भारतीय बौद्ध महासभेच्या उद्दिष्टपूर्ती साठी तन मन धनाने काम करण्याचे अभिवचन यावेळी धर्मुजी नगराळे यांनी दिले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्यातील सर्व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते. यांचेसह जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.