हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- सविस्तर वृत्त असे आहे की शहरातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदन सिंह चंदेल यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्य भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन एकदंत लॉन मध्ये करण्यात आले होते.
आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात २० महिला सह १७५ पुरुषांनी रक्तदान केले. सर्व रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले. हे सर्व रक्त चंद्रपूर वैद्यकिय महाविद्यालय येथील कर्मचाऱ्यांनी संकलन केले.
या शिबिरात विश्वजित चंदेल, भाजपा शहर महासचिव मनिष पांडे, भाजयुमो अध्यक्ष ऍड. रणविजय, शिवचंद त्रिवेदी, देवेंद्र वाटकर, घनश्याम बुरडकर, सतीश कनकम, किशोर मोहुर्ले सह आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित