प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागभीड:- भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत उभे असलेले उमेदवार सुधिर मुंगटीवार यांनी जाहीर सभेत अश्लील आणि खळबळजनक वक्तव्य केले. त्यामुळे काँग्रेस सुधीर मुनगंटीवार यांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.
आज दिनांक ११ एप्रिलला भाजपा उमेदवार राज्याचे मंत्री सुधिर मुंगटीवार यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्याबाबत संपूर्ण महिला तालुका, शहर महिला काँग्रेस कमिटी नागभीडच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यावेळी या महिलांनी सांगितले की, दिनांक 8 एप्रिलला झालेल्या चंद्रपूर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत मंत्री सुधीर मुंगटीवार यांनी भर सभेत भावा – बहिनीच्या पवित्र नातेसंबंधावर अश्लील वाक्यप्रचाराचा वापर करीत तसेच कॉग्रेस पक्षाबद्दल अपशब्द वापरून काँग्रेस पक्षाची बदनामी केली. सदर वक्तव्यातून सुधीर मुंगटीवार यांनी भावा -बहिनीच्या पवित्र नात्याला काळीमा फासण्याचे काम केला आहे.
सुधीर मुंगटीवार चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे सांस्कृतीक कार्यमंत्री आहेत. पण त्यांनी असांस्कृतीक शब्दाचा वापर करून समस्त महिला वर्गाचा अपमान केला आहे. तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. यासाठी महिला नागभीड तालुका व शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने कमेटीच्या वतीने ठाणेदार नागभीड यांना निवेदन दिले.
यावेळी महिला काँग्रेस अध्यक्ष चिमूर विधानसभा नितुताई गुरपुडे, नागभीड तालुका महिला अध्यक्ष प्रणया गड्डमवार, नागभीड शहर अध्यक्ष सुनिता डोईजड, नागभीड नगरपरिषद माजी नगरसेविका आशा गायकवाड, माजी नगरसेविका सोनाली दांडेकर, माजी नगरसेविका सुनंदा माटे, माला मुळे, नवेगाव सरपंच शर्मिला रामटेके, योगिता मिसार ललिता मडकाम, देवांगना गजभे, अनुसया उईके, आरती भोयर, अर्चना मेश्राम, रागिणी देव्हारी, माधुरी भोयर, नुरीन सल्याणी, ज्योती नान्हे, कुंदा चहांदे, रजनी कुळे, सुनीता उईके, संघमित्र मेश्राम सह शेकडो पदाधिकारी यांची उपस्थिती होती.