अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- रमजान ईदचे औचित्य साधून जामा मस्जिद इदगाह येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अतुल वांदिले यांनी इदगाह लास भेट देत सर्वधर्म समभाव या बाबीचा प्रामुख्याने उल्लेख करत सर्वधर्माचे लोक जर एकत्र आले तर देश मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही, असे विचार मांडले. तसेच सर्व मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंगणघाट विधानसभा बुथ अध्यक्ष अमोल बोरकर, अल्पसंख्याक सेल जिल्हा उपाध्यक्ष जावेद मिर्झा, गोमाजी मोरे, प्रचार प्रमुख राजू मेसेकर, गजू महाकाळकर, बच्चू कलोडे, सुशील राजू मुडे, निखील शेळके आदी उपस्थित होते.

