राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- ठाण्यातील मुंब्रा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंब्रा परिसरात एका आईने आपल्याच पोटच्या 18 महिन्याच्या मुलीचा नरबळी दिला असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आई-वडिलांना अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ठाण्यातील मुंब्रा इथं अघोरी कृत्यासाठी 18 महिन्यांच्या पोटच्या मुलीचा आई-वडिलांची बळी दिला असल्याचं समोर आलं आहे. बाळाच्या अंगात शैतान येतो, असं सांगून आईने आपल्या बाळाला स्मशानभूमीत घेवून गेली होती. त्यानंतर तिथे तिची हत्या करण्यात आली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा सगळा प्रकार एका निनावी पत्रामुळे उघड झाला आहे.
पोलिसांना एक निनावी पत्र सापडलं त्यानंतर तपास केला असता सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी आई वडिलांना ताब्यात घेतलं. सुरुवातीला दोघांनीही उडवाउडवीची उत्तर दिली. मुलांचा सांभाळ करता येत नसल्याने हत्या केल्याची खोटी कहाणी आईने रचली होती. पण पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघं पोपटासारखे बोलायला लागले. बाळाच्या अंगात शैतान येतो, त्यामुळे अघोरी कृत्यासाठी हत्या केल्याचे दोघांनी कबूल केलं आहे. मुंब्रा पोलिसांनी मुलीच्या आई वडिलांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.