रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातील तिर्थपूरी शहरात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
‘ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला, कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला. बाबासाहेबांनी दलित वर्गाला समाजात समानता मिळवून देण्याबरोबरच त्यांनी समाज सुधारणे साठीही अनेक कामे केली. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. पण, ते अवघ्या जगासाठी एक मूर्तिमंत उदाहरण बनले आहेत, ज्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते” डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी देशभरात साजरी केली जाते. त्याचमुळे तिर्थपूरी शहरात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित भिमजंयती अध्यक्ष राहुल पटेकर, नगरसेवक तुळशीराम, शंकर भालेकर, वानखेडे व सर्व भिमसैनिक, सोमेश वानखेडे, मुकेश प्रधान, अशोक वानखेडे, आकाश गाडेकर, संजय भालेकर, प्रदिप गाडेकर, आतिश वानखेडे, तेजस गाडेकर, बाळ गाडेकर, आदित्य बनसोडे, विकास साबळे, उमेश गाडेकर, अशोक गायकवाड, विकास गाडेकर, प्रकाश वानखेड़े सह शेकडो आंबेडकरी नागरिक उपस्थित होते.