अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यासाठी ‘पत्रकारांनी दारू, मटण व पैसे घेऊन बातम्या छापल्या’ ह्या विधानाचा निषेध करून असे विधान करणाऱ्या वर बहिष्कार टाकून संबंधितावर चौकशी सह कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी ह्यांना नगरिकांद्वारे देण्यात आले.
लोकसभेच्या निवडनुकीच्या प्रचारार्थ हिंगणघाट येथील सभेत सुबोध मोहिते यांनी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारितेवर हल्ला केला आणि अपशब्दांचा वापर केला. पत्रकारा बाबत बेताल वक्तव्य करत ‘पत्रकारांनी दारू मटण व पैसे घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बद्दल वृत्तांत छापले, असे संबोधन केले. ह्या त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय च्या संघर्षात सहभागी असणारे लोकांनी निवेदन दिले.
याच बरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हिंगणघाट जवळील मौजा कोल्ही इथे करण्यात यावे ही मागणी करण्यात आली, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा श्याम इडपवार ह्यांनी यावेळी दिला. यावेळा ह्या ठिकाणी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय स्थापित होत असल्याची चर्चा आहे. पण यामुळे शहरातील उद्योगधंद्यांना आणि शहराला फार मोठे नुकसान होईल असे निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना आंदोलनकर्त्ये श्याम इडपवार, संदेश मून, पत्रकार सुरेंद्र बोरकर, मकसूद बावा, सतीश जैस्वाल, गव्हा गावचे महेंद्र कावळे, कैलास मेश्राम इत्यादी उपस्थित होते.