देवेंद्र शिरसाट, हिंगणा नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जिल्हातील वानाडोंगरी येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला चक्क रात्रीच्या सुमारास वसतिगृहातून बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. हा खळबळजनक प्रकार समाज कल्याण विभागाच्या वानाडोंगरी येथील वसतिगृहात घडला. प्रवेश रद्द झाल्याने येथील वॉर्डनने तिला बाहेरचा रस्ता दाखवला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, वसतिगृहातून बाहेर काढण्यात आलेली विद्यार्थिनी ही व्हायसीसी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला आहे. सध्या परीक्षाही सुरू आहेत. ती ग्रामीण भागातील रहवासी आहे. 14 एप्रिलला वसतिगृहात झालेल्या कार्यक्रमाबाबत काहींनी यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर येथील एका मुलीला त्रास झाला. त्यातूनच नाराजीचा प्रकार घडला.
पीडित विद्यार्थिनी एका मुलीने केलेल्या आरोपावरून मला रात्री बाहेर काढण्यात आले. माझी परीक्षा सुरू असून तब्येतही खराब आहे. मी जवळपास अर्धा तास शुद्धीवर नव्हते. वॉर्डनला सर्व माहिती सांगितल्यावरही त्या ऐकण्याच्या तयारीत नाही. यापूर्वीही त्यांनी मला त्रास दिला आहे.
यासाठी पीडित विद्यार्थिनीला दोषी ठरवून वॉर्डनने तिचा प्रवेश रद्द करीत थेट वसतिगृह सोडण्याचे फर्मान काढले. वडिलांना बोलवून विद्यार्थिनीला घेऊन जाण्यास सांगितले. रात्रीच्या वेळी तिला सर्व साहित्य घेऊन वसतिगृह सोडण्याचे आदेश देण्यात आले. याच दरम्यान विद्यार्थिनीने गोंधळ घालत वॉर्डनशी अरेरावी केली. या खोलीत विद्यार्थिनीने स्वतःला कोंडून घेत जिवाला बरेवाईट करण्याची धमकी दिली.
दरम्यान पोलिसांना बोलावण्यात आले. समाज कल्याणचे अधिकारी दाखल झाली. विद्यार्थिनीची वागणूक योग्य नसल्याने कारवाई करण्यात आल्याचे विभागातील सूत्रांकडून सांगण्यात येते.