मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील महागाव खुर्द येथील मेश्राम परिवाराला काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आर्थिक मदत केला.
सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की महागाव खुर्द येथील नारायण मेश्राम यांना लखव मारला, घराचा कर्ताधरता व्यक्ती अपंग झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसडले आहे. ही बाब आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना कळताच त्यांनी परिस्तिथी जाणून घेतली व त्यांना मदतीचा हात म्हणून आर्थिक मदत केली व त्यांना आर्थिक संकटातून सावरले.
यावेळी बाळूभाऊ भोगामी तालुका काँग्रेस अध्यक्ष भामरागड, सुधाकर तिमा, राजू दुर्गे, गणेश चौधरी, श्रीनिवास आलम, कार्तिक तोगम मरपल्ली माजी उपसरपंच, प्रमोद गोडसेलवार, गुरुदास दुर्गे, लिंगेश दहागावकर, लक्ष्मण चींतावारसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.