अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- इयत्ता 26 तारखेला भारतातील महापर्व लोकसभा निवडणूक पार पडणार असून शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असून पुढील दोन दिवसात या निवडणुका शांतते कशा पार पाडता येईल याकरिता शहरात मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षकांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या.
त्यामध्ये सीआयएसएफ, पीटीएस नागपूर, बीड जिल्हा पोलीस, हिंगणघाट पोलीस व गृहरक्षक दल यांची तैनाती करण्यात आली. आज पोलीस अधीक्षक नूरल हसन यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात रूट मार्च चे आयोजन करण्यात आले. हा रूट मार्च पोलीस स्टेशन हिंगणघाट येथून शहरातील मुख्य रस्त्याने काढण्यात आला. आणि सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले या रूटमार्च मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, पोलीस ठाणेदार आयपीएस वृष्टी जैन सह पोलीस अधिकारी यावे उपस्थित होती.

