राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आप खासदार संजय सिगं यांची जाहीर सभा. महाविकास आघाडीच्या हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा लोकसभेचे मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचार निमित्त हिंगणघाट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आप खासदार संजय सिंग भव्य जाहीर सभा पार पडली. यासभेला माजी गृहमंत्री अनिल देशमुख, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्रा मध्ये महाविकास आघाडी साठी पुरक असे वातावरण आहे. उस्फुर्त असा प्रतिसाद महाविकास आघाडीला तरुण, महिला, शेतकरी देत आहेत, पण फक्त उत्साह दाखवून सभेला हजेरी लावून होणार नाही आपल्याला बदल घडवायचा आहे असे मत महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी व्यक्त केले.
दहा वर्षात मोदी सरकार अनुभवले. सत्तेवर येण्या आधी शेतकरी, युवक व महिलांना दिलेली एकही आश्वासन पूर्ण केले नाही. प्रत्येक आश्वासन फोल ठरले. तीन कृषी कायदे पाशवी बहुमताने पास केले. याविरुद्ध 378 दिवस शेतकरी वर्गानी एकजुटीने आंदोलन केले. 700 शेतकरी शहीद झाले व कोणाही पुढे न झुकणारे मोदी शेतकरी वर्गाच्या एकजुटी पुढे झुकले असे मनोगत अमर काळे यांनी केले.
शेतकरी वर्गाचे उत्पन्न दुपट्ट करू असे सांगणारे मोदी यांनी शेतकरी वर्गाच्या आत्महत्या दुप्पट केल्या. नागपूर येथे येणारा वेदांत प्रकल्प गुजरात येथे नेला परंतु फडणवीस एकही शब्द बोलू शकले नाहीत. ही लाचारी महाराष्ट्र सहन करणार नाही असे मनोगत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
संविधान वाचविण्यासाठी आमची लढाई :- खा. संजय सिंग आज देशाचे संविधान धोक्यात आहे. सरकारी यंत्रनेचा दुरुपयोग करून विरोध पक्षाच्या नेत्यांना ईडीचा धाक दाखवून आपल्या पक्षात घेऊन पावन करीत आहेत असा आरोप आपचे दिल्ली येथील खा. संजय सिंग यांनी केला. पंतप्रधान मोदी यांच्या धोरणा विरुद्ध टीका केली म्हणून दिल्लीचा चेहरा मोहरा बदलविणारे केजरीवाल याना मोदी यांनी जेल मध्ये टाकून एका वेगळ्या प्रकारच्या हुकूमशाहीची झलक दाखवून दिली. या विरुद्ध आपल्याला लढायचे आहे.आज मोदी सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना बदलविन्याच्या मागे आहेत. परंतु असे झाल्यास हा संपूर्ण भारत पेटून उठेल असे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी केले.
मोदी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना जेल मध्ये टाकले. निवडणूक आयोग हे पक्षपाती असून मोदींचे चाकर म्हणून काम करीत आहे. आमचे चिन्ह दुसऱ्याला देऊन आमच्यावर अन्याय केला आहे. या अन्यायचा बदला तुम्ही काळे यांना निवडून आणून घ्या असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, दिल्लीतील सरकार हे महाराष्ट्र द्वेष्टे असून सारे उदयोग गुजरातला जात असतांना ना गडकरी हे चूप बसून राहिले.? दिला नाही दाना पण मला बाजीरावं म्हणा अशी मोदींची अवस्था आहे.
कर्नाटक व मध्यप्रदेश येथे प्रचार करतांना मोदी व शहा यांनी देवाचे नाव घेऊन प्रचार केला परंतु आमच्या गीतातील जय भवानी या शब्दावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. पण ते शब्द आम्ही काढणार नाही. अस मनोगत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
यावेळी माजी आमदार सुरेश वाघमारे, आमदार रणजित कांबळे,अचारुलता टोकस,विरेंद्र माजी आमदार अनिल बोडे, जगताप,जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, किशोर माथनकर, राजू तिमांडे, अतुल वांदिले,सुधीर कोठारी, राजेंद्र वैद्य,मनोज चांदूरकर,आप प्रदेशाध्यक्ष अजित फाटके, सलील देशमुख, जावेद हबीब, नितेश कराळे, श्रीकांत मिरापूरकर, राजू खूपसरे, निलेश धुमाळ, श्रीकांत दौड, प्रमोद भटे, मनोज कडू, आशिष पांडे, भूषण ढाकुलकर, प्रमोद भोमले, अनिल जवादे, शब्बीर विद्रोही, प्रलय तेलंग आदी उपस्थित होते. या सभेला इंडिया आघाडी (महाविकास आघाडीचे) सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते.