उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील श्रवस्ती बुद्ध विहार येथे 21 एप्रिल ते 23 एप्रिल रोजी तिन दिवसीय धम्म शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या धम्म शिबिराचे उद्देश हा आहे की, धम्म गतिमान करणेसाठी पुढील पिढी घडविणे फार मोठे कार्य आहे, आणि ते कार्य व्यक्तिमत्व विकास व बालसंस्कार शिबीर घेऊन नवीन पिढी घडविणेस विहारामार्फत सुरवात झाली आहे. या शिबिरातुन नक्कीच विचारांचे बाबासाहेबाना अभिप्रेत तरुण, तरुणी नक्कीच घडतील अशी अशा निर्माण झाली आहे. या शिबिरासाठी एकूण 79 शिबिरार्थी यांनी सहभाग घेतला होता.
हे तीन दिवसीय शिबीर ज्याच्या संकल्पनेतून साकारले ते विहाराचे माजी अध्यक्ष व त्रिरत्न मानव विकास संशोधन केंद्र, केरेवाडीचे धम्मचारी ज्ञानसेनजी विलास उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी या शिबीरसाठी शिक्षण व सहाय्य्क शिक्षक म्हणून चंद्रकांत नागवंशी, दीपमाला कांबळे, विकास भिसे, शैलजा साबळे, सपना भिसे दिलेली जबाबदारी योग्यरीत्या पार पडली.
21 एप्रिल 2024 रोजी फारुख गवंडी सर (अनिस) यांनी अंधश्रद्धे बद्दल मुलांना चमत्कार व काही गोष्टीच्या माध्यमातून प्रबोधन केले. यावेळी फारुख गवंडी यांनी अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. असे मत व्यक्त केले.
21 ते 23 या तीन दिवसीय शिबीरात बुद्ध विहाराचे अध्यक्ष सुधीर कोलप व थोरात सर यांनी भोजनदान दिले. यावेळी य शिबिरास यालेल्या शेकडो नागरिकांनी या भोजन दानाचा आस्वाद घेतला.
शिबिरासाठी शिबिरार्थी यांनी सहभाग घेतला त्या सर्वांचे आणि त्याना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचे व शिबीर संपन्न होणेसाठी सर्व स्तरात मदत करणाऱ्या सर्वांचे विहारामार्फत आभार मानण्यात आले.