नांदेड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नांदेड:- येथून लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. राज्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांत आज मतदान होत आहे. मतदारांचा मोठा प्रतिसाद दिसून येत आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघात एका तरुणाने कुऱ्हाडीने चक्क ईव्हीएम मशीन फोडल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. साधारण 500 हून अधिक लोकांचं मतदान या मतदान केंद्रावर सकाळपासून झालं होतं. नांदेड लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ गावात एका तरुणाने कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडली आहे. भैय्यासाहेब येडके असे या तरुणाचे नाव असून तो मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आला होता. पण मतदानाला येताना त्याने चक्क लपवून कुऱ्हाड आणली.
भैय्यासाहेब येडके हे मतदान करण्यासाठी केंद्रामध्ये दाखल झाल्यानंतर मतदान करण्या ऐवजी त्यानं ईव्हीएम मशिनवरच कुऱ्हाडीनं घाव घातला. यामुळं मशिनचं नुकसानं झालं. यानंतर पोलिसांनी तत्काळ भैय्यासाहेब येडके या तरुणाला ताब्यात घेतले. पण घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच मतदान केंद्रावरील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.