नितेश पत्रकार यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- आज लोकसभेचे दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले. पण यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे मतदान न करता मतदारांच्या बोटाला शाही लावून त्यांना पैशाचे वाटप करून मतदानापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा प्रकार शिवसेना ठाकरे गटाने उघड केला आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण लोकसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे.
आज यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदान होते यावेळी यवतमाळच्या छोटी गुजरी परिसरामध्ये भाजपची काही मंडळी एका रजिस्टरवर मतदारांची नावे लिहीत होती. तसेच त्या मतदारांच्या हाताच्या बोटाला निवडणूक आयोग ज्या शाहीचा वापर करतात, ती शाई लावून त्यांना पैशांचे वाटप केल्या जात असल्याचा खळबळजनक आरोपही यवतमाळच्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजेंद्र गायकवाड यांनी केलाय. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकासह घटनास्थळी धाव घेत हा प्रकार उघड केलाय. तर या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. मात्र या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
शाई, ब्रश आणि मतदारांच्या नावांचे रजिस्टर पोलिसांनी केले जप्त : ज्यांची नावे रजिस्टर वर लिहून बोटाला शाई लावल्या जात होती ते मतदार हे विशिष्ट सामाजातील असून त्यांना मतदान न करता त्या एवजी पैसे देण्यात येत होते. तसेच त्यांचे नाव एका वहीत नोंदवून त्यांच्या हाताला शाही लावण्यात येत असल्याची बाब यात उघडा झाली आहे. याबाबत यवतमाळच्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजेंद्र गायकवाड यांनी तात्काळ तक्रार केल्यानंतर निवडणूक विभागाच्या भरारी पथकासह पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला असता काही अज्ञात व्यक्ती त्याठिकाणाहून पळून गेलेत.
तर ही व्यक्ति दुसरे तिसरे कुणीही नसून भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे. या कारवाईत पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाच्या हाती बोटाला लावल्या जात असलेली शाई, ब्रश आणि मतदारांच्या नावांचे रजिस्टर लागले आहे. तर याप्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची कारवाई सुरू असून आधिक तपास सध्या केला जात आहे.