मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देसाईगंज:- जागतिक कीर्तीचे थोर व्यक्तीमत्त्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे याची देही याचि डोळा बघण्याचे भाग्य 29 एप्रिल 1956 या दिवशी देसाईगंजच्या नागरिकांना लाभले होते. दीक्षाभूमी देसाईगंज येथे त्यांनी भेट दिली होती. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्श दिन सोहळा दीक्षाभूमी देसाईगंज येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्श दिना निमित्ताने सम्यक जागृत बौद्ध महिला समितीने दरवर्षीप्रमाणे यंदा ही 29 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श दिन उपासक, उपासिकांच्या सहकार्याने आयोजित केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदूराव राऊत, उद्घाटक प्रा. दुधे सर, प्रमुख मार्गदर्शक सुरेश मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून इंजि. बागडे महावितरण देसाईगंज, इंजि. खोब्रागडे, नुबीर फुले आणि अल्का पिलेवान समता सैनिक दल होते.
याप्रसंगी दीक्षाभूमी देसाईगंज येथे 21 ते 25 एप्रिल दरम्यान प्रशिक्षण व प्रबोधन शिबीरात भाग घेतेलेल्या शिबीरार्थीना सन्मान प्रमाणपत्रे देण्यात आली. चंदूराव राऊत यांनी त्यांच्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांची एक महिन्याची पेन्शन दीक्षाभूमीला दान केली. 2022 पासून ते नियमित पणे दिक्षाभूमीला याप्रकारे दान करीत आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ममता जांभूळकर, संचालन जयश्री लांजेवार तर आभार श्यामला राऊत यांनी केले.
या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य संजय मेश्राम, पुरूषोत्तम बडोले सर, जांभूळकर सर, शेंडे सर, विजय मेश्राम, बारसागडे सर, कविता मेश्राम, लीना पाटील, गायत्री वाहने, प्रतिमा शेंडे, प्रतिभा बडोले व सरिता बारसागडे यांनी केले.