पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नागपुर शहरातील एका हॉटेलमध्ये मैत्रिणीसह जेवण करीत असलेल्या राष्ट्रीय तपास एजन्सीमध्ये (एनआयए) कार्यरत आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीचा तीन मित्राने मिळून विनयभंग करून त्यांनी महिलेकडे बघून अश्लील इशारे केल्यानंतर घरापर्यंत पाठलाग केल्याची घटना समोर आली आहे. या तिघांना सदर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. राजेश कुमार तलरेजा, सूरज कुन्हाडकर आणि मनोज छाबरा (रा. अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत.
नागपुर येथील एका आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आपल्या तीन मैत्रिणींसह 22 एप्रिलला सदरमधील अशोका हॉटेलमध्ये जेवण करायला गेली होती. तिचा पती एनआयएमध्ये कार्यरत आहे. त्या महिलांच्या बाजुच्या टेबलवर आरोपी राजेश कुमार तलरेजा, सूरज कुन्हाडकर आणि मनोज छाबरा हे जेवण करीत होते. या दरम्यान, तिघांनीही त्या महिलांकडे बघून अश्लील इशारे करणे सुरु केले. महिलांनी त्यांच्याकडे बघून दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यापैकी पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा तिघांनी कारने पाठलाग केला. तिला रस्त्यात अडवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिच्या घराजवळ जाऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
पोलीस अधिकारी पतीने पत्नीसह सदर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तीनही आरोपींना अटक केली. आरोपी राजेश कुमार तलरेजा हा हॉटेल व्यावसायिक आहे. तर मनोज छाबरा हा फायफान्स कंपनीचा संचालक आहे. पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याची पत्नी असल्याची माहिती त्यांना नव्हती. राजेश कुमार तलरेजाचे आईवडील आणि भाऊ पाकिस्तानात राहतात. त्याचा भाऊ पाकिस्तानात संत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.