विठ्ठल ठोंबरे, शिर्डी /राहता ता. प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन श्रीरामपूर:- श्रीरामपूर शहरात काझीबाबा संदल मिरवणुकीत बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरच दगड फेक झाल्याचा गंबीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. घडलेल्या या घटनेमुळे या भागात बराच वेळ तणाव निर्माण झाला होता.
सदर मिरवणुकीमध्ये देश विरोधी चुकीचा पद्धतीने घोषणा देऊन पोलिसांवर दगडफेक करण्यात आली या मध्ये दोन पोलीस कर्मचारी गंबीर जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती. हा सर्व प्रकार छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडला होता. या प्रकारबाबत जहादी लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी मनसे व भाजप यांच्यावतीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करून सदर घटनेबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला.
श्रीरामपूर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक औताडे साहेब यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश अण्णा चित्ते, मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, मनसे तालुका अध्यक्ष संजय नवथर, शहर अध्यक्ष सतीश कुदळे, बीजेपी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष महेश विश्वकर्मा व आदी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.