प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागभीड:- नागभीड तालुक्यातून मुरूम व रेतीच्या अवैध चोरीला उत आला आहे. खुलेआम नदी-नाला काठावरून मुरूम व रेतीची तस्करी केली जात आहे. परंतु महसूल व वनविभागाच्या दुर्लक्षामुळे या माफियांचा जोर वाढतच चाला आहे. त्यामुळे आता ठोस कारवाईचीच गरज आहे. नागभीड तालुका नैसर्गिक वनसंपदेने नटलेले आहे. येथील नदी नाल्यावर मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे. व्यापारी वर्ग संगनमत करून या नाल्यातून रेतीचा अवैध उपसा करीत असतानाही महसूल व वन विभागाचे अधिकारी धृतराष्ट बनल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे नागभीड तालुका काँग्रेस कमिटी आक्रमक भूमिका घेतली आहे. सुरू असलेली अवैध रेती व मुरूम वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सोमवारी नागभीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांचेमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी, शहर अध्यक्ष किशोर समर्थ, उपाध्यक्ष पुरूषोत्तम बगमारे, किसान सेलचे अध्यक्ष मधुकर बावनकर,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश कुर्झेकर, प्रशांत गेडाम, संकेत वारजूकर उपस्थित होते.