महिला तक्रार निवारण बल्लारपूर येथे केस सुरू आहे.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 6 मे:- महेंद्र शेंडे ने लावलेले सर्व आरोप सूडबुद्धीने असून स्वतः ची चूक लपविण्याचा हा केविलवाणा प्रकार करीत असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत पत्नी भावना शेंडे हिने केले.
यावेळी भावना शेंडे यांनी पती महेंद्र शेंडे यांच्या विरूध्द खळबळजनक आरोपी केले. त्या म्हणाल्या की, लग्नं सुद्धा खोटं बोलून केले नोकरी नसतांनाही आहे असे सांगून मला लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून मानसिक व शारीरिक त्रास होता. परंतु आज ना उद्या माझा पती सुधारेल या भावनेतून मी दिवस काढत राहिली. परंतु पतीने अति मद्यपान करून वारंवार मला व माझ्या मुलांना मारतो, अश्लील शब्दात बोलतो, कर्जबाजारी पणाने वारंवार पैसे परत मागण्यां साठी लोकांची घरी रेलचेल असते त्यामुळे कंटाळून माझा व मुलांचा जीव वाचविण्यासाठी मी माझ्या भावाकडे कळमेश्वर जिल्हा नागपूर येथे राहत असल्याने महेंद्र शेंडे ने केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. तसेच बल्लारपूर पोलीस स्टेशन महिला तक्रार निवारण येथे तारखा सुरू असून तिथेच मी माझी संपूर्ण बाजू मांडली आहे त्यामुळे महेंद्र ला कठोर शिक्षा झाली पाहिजेत अशी माझी भूमिका राहील.
मी माझ्या भावाकडे असून मुलं सुद्धा माझ्याच सोबत सुखरूप आहेत असे पत्रकार परिषदेत माहिती दिली.

