उषाताई कांबळे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा /मेहकर:- बुलढाणा जिल्ह्यातील खास बातमी केंद्र सरकारने खंताचा किमतीत अचानक वाढ केल्यामूळे शेतकऱ्यावर पुन्हा मोदी सरकार कडून सूलतानी संकट कोसळले आहे. सरकार ने वाढलेल्या खंताचा किमतीचा निर्णय तात्काळ मांगे घ्यावा अन्यथा राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरल्या शिवाय राहनार नाही तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी म्हटले आहे.
तसेच आधिच आवकाळी आतीदृष्टीने गारपिट शेतीच्या नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. सरकार ने सोयाबीन आणि कापसाचे भाव प्रचंड पाडलेले आहेत राज्यात पिक विमा योजनाचा बोजवारा उडाला असून बैंकानी खरिपासाठी लागणारा पिक कर्ज वाटपासाठी टाळाटाळ करत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅकांनी, सोसायटी यांनी पिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना नियमानुसार वाढ नाकारली असून शेतकऱ्यांना अनेक अडचनीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सरकार ने खताचा किमतीत केलेली वाढ समर्थनिय होऊच शकत नाही. त्यामूळे सरकार ने खतामध्ये केलेली वाढ तात्काळ रद्द करणाची मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेकडून करण्यात आली आहे.