अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पोलीस स्टेशन हिंगणघाटच्या हद्दीत संदीप अरविंद उपरे वय 36 वर्ष रा. शिवाजी पार्क गेट तहसिल वार्ड, हिंगणघाट ची दिनांक 24 एप्रिल 2024 ला सकाळी 8.00 वाजताच्या दरम्यान जुनी काळया व लाल रंगाची होंडा शाईन गाडी क्र. एम एच 32 ए आर 2783 किं. 30,000 रू हे मिलींद मोटर्स शोरूम, हिंगणघाट इथून अज्ञात इसम ने चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे करण्यात आली होती.
पोलिसांनी तक्रार दाखल करूनअपराध क्र. 577/2024 कलम 379 भादवी तहत गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. या तपासात डीबी पथक हिंगणघाट ने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारांवर अज्ञात दुचाकी चोर आरोपीचा शोध घेतला आणि तपासा दरम्यान मुखबीर द्वारे प्राप्त माहिती वर काजी वार्ड, हिंगणघाट चां निवासी अरविंद रमन्ना वालकोंडे वय 40 याला ताब्यात घेऊन चौकशी केली. ज्यात आरोपीने ती गाड़ी चोरी केल्याची कबुली दिली. पुलिसानी यावरून आरोपी वर कार्यवाही करून त्याला कोठडीत डांबले.
ही कार्यवाहीत नुरुल हसन पोलीस अधीक्षक, सागर कवडे अप्पर पोलीस अधीक्षक याच्या मार्गदर्शनात रोशन पंडित उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट, प्रभारी ठाणेदार वृष्टी जैन यांच्या आदेशावरून डीबी पथक इंचार्ज पो.उप.नि. शरीफ शेख, पो हवा प्रशांत ठोंबरे, पो ना राहूल साठे, पो शी आषिश नेवारे, पो शी अमोल तिजारे, पो शी विजय काले इत्यादींनी कारवाही केली.