पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- दि. 6 मे रोजी पाचपावली पोलीस स्टेशनचे बीट मार्शल पोलीस अमलदार अतुल व मनोज हे रात्री ८.३० वा ठक्करग्राम येथे पेट्रोलिंग करीत होते. पेट्रोलिंग दरम्यान त्यांना एका महिलेचा 112 क्रमांकावरून पोलीस नियंत्रण कक्ष नागपूर शहर यांच्या मार्फतीने एका महिलेचा संदेश प्राप्त होतो. महिलेच्या संदेशात मध्ये नमूद असते की ” लष्करी बाग गल्ली नंबर ६ येथे तिला व तिच्या मुलाला तिच्या नवऱ्याने दारूच्या नशेत मारहाण केली असून दोघांनाही घराबाहेर काढले आहे व तिच्या पतीने दरवाजा आत मधून बंद केला आहे.
अशा नमूद संदेश प्राप्त होताच दोन्हीही बीट मार्शल हे गंभीर होतात व याबाबतची माहिती ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांना देतात. ठाणे प्रभारी राऊत यांनी सदरचे घटनेचे गांभीर्य ओळखून, त्या ठिकाणी त्वरित पोलीस स्टेशन हद्दीतील इतर बीट मार्शल पोलीस अमलदार देवेंद्र व प्रफुल यांना देखील लष्करी बाग येथे जाण्यासाठी सूचना देतात व स्वतः देखील घटनास्थळी निघतात. बीट मार्शल अतुल आणि मनोज हे ५ मिनिटाच्या आत लष्करी बाग गल्ली नं ६ येथे जातात. सदर ठिकाणी 10 ते 15 लोकांची गर्दी असते. बीट मार्शल हे कॉल करणाऱ्या महिलेला भेटतात. दोन्हीही बीट मार्शल यांनी सदर महिलेची विचारपूस केली असता ती सांगते की ,”पती हा दरवाजा उघडत नाही व आम्हाला घराबाहेर काढले आहे”. दोन्हीही बीट मार्शल महिलेची चौकशी करत असताना सदर ठिकाणी इतर २ बीट मार्शल देखील पोहोचतात. घटनेचे गांभीर्य ओळखून पती घराच्या आत कमी जास्त तर करीत नाही हे बीट मार्शल तात्काळ ओळखून दरवाजा ठोकावतात, परंतु आत मधून प्रतिसाद येत नाही. वरून बीट मार्शल हे घराचा दरवाजा तोडतात व आत मध्ये प्रवेश केला असता त्यांना अंधार दिसतो. त्यामुळे बीट मार्शल स्वतःच्या मोबाईल जवळील टॉर्च काढतात आणि बघतात तर काय समोर ज्या कॉलर ने फोन केला होता तिचा पती हा पंख्याला ओढणी बांधून गळफास लावलेला होता.
बीट मार्शल प्रफुल आणि देवेंद्र तात्काळ गळफास घेणारा इसम याचे पाय पकडतात . तर अतुल हा पटकन स्टूल घेऊन ओढणी सोडतो आणि मनोज हा टॉर्च पकडून राहतो. सदर इसम हा फार घाबरलेला दिसला. बीट मार्शल त्यांना खाली उतरवतात. तसेच त्यांना समजावतात व गळफास लावून घेण्याचे कारण जाणून घेतले असता त्यांना आश्चर्य वाटतं. गळफास घेण्याचे कारण हेच की पत्नीने गरम भाजी न देता थंड भाजी जेवणा करिता वाढली ! सर्व बीट मार्शल हे नमूद इसमास वैद्यकीय मदत लागते किंवा कसे याबाबत विचारले असता नमूद इसमाने त्याबाबत नकार देतो व पत्नीला देखील तक्रारीबाबत विचारणा केली असत्या ती देखील तक्रार नसल्याचे सांगते. परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर बीट मार्शल हे तेथून निघून जातात.
पोलीस स्टेशन पाचपावली चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांच्या नेतृत्वामध्ये सर्व बीट मार्शल यांनी दाखवलेले प्रसंगावधान व कर्तव्यात तत्परता दाखवल्याने सदर गळफास घेणारा इसम याचा जीव वाचविण्यात त्यांना यश मिळाले. या चांगल्या कामगिरीबाबत पोलीस स्टेशन पाचपावलीचे बीच मार्शल अतुल, मनोज, देवेंद्र व प्रफुल यांचे कार्याची पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी स्वतः दखल घेऊन त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या कार्यालयात बोलवून त्यांच्या या कार्याबद्दल त्यांची प्रशंसा करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच पुढे देखील याच प्रकारे कार्य करीत राहावे याबाबत प्रेरणा दिली.