प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून रेतीची तस्करी जोमात सुरू आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वर्धा यांना शिवसेना पक्षाचे सहसंपर्क प्रमुख रविकांत बालपांडे, जिल्हाप्रमुख श्रीकांत मिरापूरकर तथा तालुकाप्रमुख सतीश धोबे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदनात म्हटले आहे की, आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या वणा नदीच्या पात्रात वाळूघाट आहे. सदर वाळूघाटात वाळूची चोरटी वाहतूक रात्रदिवस सरासपणे जिल्ह्यातील हिंगणघाट, देवळी, पुलगाव, आर्वी, वर्धा सेवाग्राम व सावंगी या सारख्या शहरात मोठ्या प्रमाणात होत आहे. ही चोरटी वाहतूक करताना सदर वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहून नेणारे वाहतूकदाराची वाहतूक सुरू आहे. सदर वाहतूक करताना बरेचसे वाहनाचे इन्शुरन्स संपले आहे. तर काही जे कागदपत्रे अपूर्ण आहे.
त्यामुळे आपल्या कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील भरारी पथक या रेती चोरी वाहतूक करणारे ह्या रेतीमाफियाना क्षमतेपेक्षा अधिका- अधिक रेती वाहून नेणारे टिप्पर व ट्रक यांना दिसून येत नाही काय ? असा प्रश्न आमच्या शिवसेनेच्या वतीने आपणास विचारण्यात येत आहे.
कारण चोरीची वाळू भरलेले टिप्पर हे हिंगणघाट येथील आयपीएस अधिकारी असलेल्या सृष्टी जैन मॅडम परिविक्षा कालावधी यांनी चार – पाच दिवसांपूर्वी चार ते पाच चोरी करणारे रेतीचे भरलेले टिप्पर पकडून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे जमा केले. परंतु महसूल व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कार्यालय -वर्धा यांच्यामार्फत सदर टिप्पर व ट्रक पकडण्यात येत नाही. तरी राष्ट्रीय महामार्ग ने सदर ट्रक टिप्पर रेती चोरी सरासपणे मांडगाव मार्गे अलीपुर मार्गे, वर्धा मार्गे वाहतूक करीत आहे.
आपल्या या निष्काळजीपणामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडतो आहे. तरी आपणास या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते या सर्व वाहनावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा हिंगणघाट शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल यांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील अशा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन देताना शिवसेना पक्षाचे उप तालुकाप्रमुख प्रकाश अनासाने नगरसेवक मनीष देवडे, शंकर मोहमारे, भास्कर ठवरे, वर्धा तालुका प्रमुख सुयोग नवघरे उपस्थित होते.