अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर येथे बुद्धवासी ताना उर्फ कौसल्याबाई कृष्णा बागडे याच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रबोधनकार व गायक ज्ञानदेव डोंगरे यांनी आपल्या संगीतमय भजनातून हुंडा, अंधश्रद्धा, गुटखा, दारू आणि प्राचीन चाली रुढी बाबत समाजात जनजागृती केली. त्या प्रित्यर्थ त्यांच्या व सहाय्यकांचा लुंबिनी बुद्धाविहाराणाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात बागडे कुटुंबीयांच्या वतीने मंगळवारी ज्ञानदेव डोंगरे शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सुधाकर बागडे, राष्ट्रपाल बागडे, राहुल बागडे, उत्तम बागडे, विजय बागडे, राजकुमार बागडे, अँड युवराज बागडे भिक्कुलाल डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकी शेंडे, स्तूप बागडे, धनंजय बागडे, उद्देश बागडे, गौरव बागडे, हिमांशू गायकवाड, राणी कापसे, बिट्टू सोनटक्के यांनी परिश्रम घेतले.