अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर येथे प्रत्येक शनिवारला सकाळी ७.३० वा.हनुमान चालीसा वाचन करण्याचे काम सावनेर शहरातील प्राचीन कोलार नदीच्या काठावर आसलेल्या हनुमान मंदिर येथे मागील २ वर्षा पासून अखंडित सुरू आहे.
२ वर्षापूर्वी काही शिक्षित नागरिकांनी आठवड्यातून एकदा तरी एकत्र येऊन आपल्या धर्माविषयी जागृती वाढवावी तसेच मनाला आध्यात्मिक शांती व बळ देणाऱ्या हनुमान चालीसा पाठ करण्याचे विचार केला. सुरुवातीला थोड्या लोकांपासून सुरू झालेला हा छोटासा उपक्रम आज बघता बघता २ वर्षात एक मोठ्या मोहिमेत रूपांतरित झाला.
या कार्यक्रमात डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, वेकोलीचे अधिकारी, व्यापारी तसेच शिक्षण घेत असलेले तरुण व बाल विद्यार्थी सुद्धा आवर्जून उपस्थित असतात. दर शनिवारला या कार्यक्रमाला १०० शनिवार पूर्ण झालेत. या प्रसंगी ११ वेळा सामूहिक हनुमान चालीसा पठण घेण्यात आला.
या कार्यक्रमात जवळ पास ६० नागरिक जमले, त्यानुसार बघता ६६० वेळा हनुमान चालीसा पठण घेण्यात आला.
या कार्यक्रमानंतर लगेच अल्पोपहाराची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून डॉ.राजेश बसवार, तुषार उमाटे, डॉ.पंकज घटोळे, डॉ.नितीन पोटोडे, डॉ.पराग घाटोडे व भाऊ गोतमारे सर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर कुंभारे, राजेश भारद्वाज, हरीश पाणपत्ते, भरत थापा, प्रशांत धिरडे, पंकज चरपे, गणेश माहुरकर, राकेश भाटी, भूषण कुबडे, महेश कामोने, मयूर राऊत, प्रतीक जामुनकर, प्रवीण गोखले, प्रवीण नारेकर, योगेश लाखानी, ऋषिकेश बुधोलिया, नकुल भुडके, पंकज साबळे, अभिजित सऱ्याम, जय कालभुत, संकेत गोखले, वैभव पोकळे, भावेश लाड, राजू गाढवे, शैलेश ढवळे, गौरव दिवटे, चैतन्य लाड, महेश बेलेकर, सिद्धेश नाखले, अथर्व साबळे, निकुषा धोटे, पूनम धारपुरे, अवणी बहुरुपे, सानवी जगनाडे, वेद हनवते, प्रियांश ढोबळे, किंशुल मडेकर, वेदांत धोटे, नयन मानकर, अक्षोभ्यसिंह उत्तमजी कापसे, अभिषेकसिंह गहरवार व इतर गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमाचे संचालन किशोर कुंभारे आणि आभार प्रदर्शन राजेश भारद्वाज यांनी केले.