अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील रोहनखेडा येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील शेत शिवारात आज रविवारी १२ मे ला दुपारी ३ वाजताच्या सुमारास वादळीवारा व विजेच्या कडकडा सह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी शेतकरी श्रीहरी जानराव वानखेडे यांच्या शेतामध्ये बांधून असलेल्या बैलजोडी वर विज पडून बैलजोडी जागीच ठार झाली. यात शेतकरी श्रीहरी यांचे जवळपास १ लाख रुपयाचे नुकसान झाले.
ऐन खरीब हंगामाच्या तोंडावर बैलजोडीचा असा दुर्दवी मृत्यू झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळे असुन शेतीची मशागत कशी करावी असा प्रश्न शेतकरी श्रीहरी यांच्या समोर उभा ठाकला आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.

