श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूकित उद्या सोमवारी चौथ्या टप्प्याचे मतदान होत असून बीड लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी सरळ लढत दिसली असली तरी वंचित बहुजन आघाडीच्या अशोक हिंगे यांच्या उमेदवारीने उमेदवाराच्या मनात धगधग वाढविली आहे. त्यांच्यावर सर्वांची नजर राहणार आहे.
बीड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 41 उमेदवार असले तरी ही लढत तिरंगीच होत आहे. निवडणूक प्रचारात मराठा – ओबीसी वाद दाखवून आरोप-प्रत्यारोप झाले. आता पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे व अशोक हिंगे यांच्या भवितव्याचा फैसला सोमवारी मतपेटीत बंद होणार असून निकालानंतर बीडचा नवीन खासदार कोण ? हे समोर येईल. पंकजा मुंडे या ओबीसी प्रवर्गातील असून बजरंग सोनवणे व अशोक हिंगे हे कुणबी मराठा असल्याने ओबीसी प्रवर्गातील आहेत. त्यामुळे तिघांपैकी कोणीही निवडून आले तरी बीडचा खासदार हा ‘ओबीसी’चाच होणार आहे, हे यावरून स्पष्ट होते.
बीडच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी मराठा समाजावर आरोप करून प्रत्येक वेळच्या सवई प्रमाणे निवडणूक जातीयवादावर आणली. मात्र, यावेळी त्यांचे जातीयवादाचे हत्यार त्यांच्यावरच उलटले आहे. कारण, यावेळी निवडणुकीवर मनोज जरांगे पाटील यांचा आणि मराठा आरक्षणाचा प्रभाव होता. त्यामुळे निवणुकीत मराठा-ओबीसी म्हणून एकमेकांवर कितीही आरोप-प्रत्यारोप झाले असले तरी बीडचा होणारा खासदार हा ‘ओबीसी’च असणार आहे. कारण, पंकजा मुंडे या ओबीसी असल्या तरी बजरंग सोनवणे आणि अशोक हिंगे हे कुणबी मराठा असल्यामुळे ओबीसी च आहेत. त्यामुळे विजयी कोणीही झाले तरी बीडचा खासदार हा ओबीसी समाजाचाच होणार हे निश्चित आहे.
अपक्षांच्या मतविभाजनाचा फटका कोणाला?
बीड लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत 41 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार असला तरी कोणीही उठून मला खासदार व्हायचंय म्हणून निवडणूक लढवायची म्हणून जमत नाही. आपल्या उमेदवारीने मतांचे ध्रुवीकरण तर होणार नाही ना आणि विजय चुकीच्या माणसांचा तर होणार नाही ना ? याचा सारासार विचार करून निवडणूक लढवली तर लोकशाही अधिक बळकट होईल. असे असले तरी बीड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 41 अपक्ष उमेदवार असून यामध्ये बहुतांश मराठा-मुस्लीम उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. मराठा-मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण झाल्यास या मतविभाजनाचा फायदा कोणाला बसेल आणि फटका कोणाला बसेल हे न कळण्याएवढा मतदार अज्ञानी राहिलेला नाही. त्यामुळे मतदारांनी सूज्ञपणाने निर्णय घेण्याची गरज आहे.
जरांगे आरक्षणासाठी मुंबईला येऊ शकतात, मग पुण्या-मुंबईतून मराठे बीडला मतदानाला का येऊ शकत नाही ?
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मराठा समाजाच्या भवितव्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी प्राणांतिक उपोषण केले, आंदोलनासाठी मुंबई गाठली, तरीही सरकारने त्यांच्या मागण्या लेखी आश्वासन देऊनही पूर्ण केल्या नाहीत. मनोज जरांगे यांचे महत्त्व टिकवून ठेवायचे असेल, मराठा समाजालाही आरक्षणासह इतर मागण्या पदरात पाडून घ्यायच्या असतील तर मुंबई-पुणे सह राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मराठा समाजाने कोणाच्या बोलावण्याची आणि गाड्या-घोड्यांची वाट न पाहता मतदानासाठी गावी येण्याचे आवाहन मराठा समाज सग्यासोयऱ्यांना करत आहे