अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मागील काही दिवसांपासून हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन करून वाहतूक सुरू आहे. त्यात मांडगाव शिवारात महसूल विभागाच्या पथकाने उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या मार्गदर्शनात अवैध वाळू वाहून नेणाऱ्या तिन टिप्परला ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.
प्राप्त माहितीनुसार २५ मे च्या रात्री २ वाजता महसूल विभागाचे पथक अवैध वाळू विरोधात रात्रकालीन पेट्रोलिंग करीत असताना मांडगाव शिवारात रस्त्यावर टिप्पर क्रमांक एम एच ३६ – १६३२ चालक अनिल कोराटे राहणार बोरगाव मेघे, टिप्पर क्रमांक एम एच २७ बिएक्स ७५५८ चालक गजू मसराम, टिप्पर क्रमांक एम एच ३१- ६४४२ चालक रविंद्र सुरजुसे, हे तिन टिप्पर अवैध रीत्या वाळू वाहतूक करताना आढळून आले.
यावेळी टिप्पर चालकांना वाळू वाहतूकी संदर्भात परवाना विचारला असता तिन्ही टिप्पर चालकाकडे वाळू वाहतूकी संदर्भात कोणताही कागदपत्रे आढळून आले नाही. यावेळी पथकाने तिन्ही टिप्पर जप्त करून तहसील कार्यालयात जमा केले. हि कारवाई उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पाताई सोनाले, तहसिलदार कपिल हाटकर यांच्या मार्गदर्शनात प्रभारी तहसीलदार राजेंद्र सयाम यांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदार संजय काटपाताळ, मंडळ अधिकारी प्रसाद पाचखेडे, तलाठी राहुल बरबट, मयुर कुटॆ तसेच मंडळ अधिकारी पाईकमारी, सुनिल जाधव यांनी केली.