हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- दिनांक 24 मे रोज शुक्रवार ला बुध्द भूमी राजुरा येथील विहारां मध्ये भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्याच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती व बुध्द पौर्णिमा निमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बुध्द भूमी राजुरा येथील विहारांतील पदाधिकाऱ्यांना धम्म बांधव भगिनीं येथील नागरिक एकत्र येऊन या कार्यक्रमाला सुरुवातिला प्रथम तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून अगरबत्ती मोमबत्ती दिपप्रजालित करून सामूहिक त्रीशरण पंचशील घेण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी अशोक दुबे ग्रामशाखा अध्यक्ष यांनी स्वागत गीत म्हटले यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमराव खोब्रागडे उपाध्यक्ष यांनी केले. उदघाटन किशोर तेलतुंबडे जिल्हाध्यक्ष यांनी भारतीय बौध्द महासभा चे कार्य या विषयावर प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी सपनाताई कुंभारे केंद्रिय शिक्षिका व महिला जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर, यांनी बाबासाहेब यांची धम्मक्रांती, बौध्द धम्म या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले, अशोक घोटेकर विदर्भ प्रदेश अध्यक्ष व महाराष्ट्र संघटक चंद्रपूर, गडचिरोली यांनी भारताचे संविधान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले आणि या कार्यक्रमाचे तालुका अध्यक्ष धर्मुजी नगराळे यांनी बाबासाहेबांनी स्थापन केलेली भारतीय बौध्द महासभा या संस्था मध्ये प्रत्येक व्यक्तीने एकत्र येवून राजुरा तालुक्यामध्ये बौध्द धम्माचा चोवीस प्रकारच्या शिबिर मधून प्रसार, प्रचार चे काम करून माणूस जोडण्याच्या कारखाना तयार करावा या साठी सर्वांनी सहकार्य करावे या प्रकारे मार्गदर्शन केले.
यानंतर मानवी करमनकर आणि त्यांच्या संघ यांनी खूब सुंदर सामूहिक डान्स केला, मिताशी गोंगले, गौतमी मेश्राम, लाडे, अदवित नगराळे, गायत्री रामटेके यांनी सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर “मी रमाई बोलते” हा एक अंकी नाट्य प्रयोग गायत्री रामटेके यांनी त्यागमुर्ती रमाई यांच्या जन्मापासून ते मुर्त्यू पर्यंत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये गुरुबलक मेश्राम जिल्हा कोष्याध्यक्ष, प्रफुल भगत उपाध्यक्ष, शेषराव सहारे सचिव, गौतम चौर कोष्याध्यक्ष, मुरलीधर ताकसांडे उपाध्यक्ष, प्रभाकर लोखंडे, ईश्वर देवगडे, विजय जुलमे, आनंद जांभूळकर लाखनी, साक्षी नळे, कमांडर समता सैनिक दल, मेघाताई बोरकर अध्यक्ष, किरण खैरे कोष्याध्यक्ष, सुजाता नळे सरचिटणीस, कमल टेकाडे, पौर्णिमा ब्रम्हणे, वंदना देवगडे, प्रणाली ताकसांडे, वनिता मून, मंजुषा दुपारे इत्यादी उपस्थिती होते.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन अश्विनी मावलीकर व आभार प्रदर्शन गौतम चौरे सरचिटणीस यांनी केले. या कार्यक्रमाला राजुरा तालुक्यातील बौद्ध बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती.