अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विद्या प्रसारक मंडळ सावनेर द्वारा संचालित जवाहर कन्या कला वाणिज्य व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय सावनेर तर्फे व्यवसाय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे,सांस्कृतिक सभागृह जवाहर कन्या विद्यालय सावनेर येथे दिनांक २ जून २०२४ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत आयोजन केलेले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अनिल मस्के उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर लाभलेले आहेत. तसेच मुख्य वक्ते म्हणून डॉ.महेंद्र गजभिये (बीडीएस, एमए, एमपीएससी) शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया, श्री.रामेश्वर बुरडे माजी मुख्य शाखा अधिकारी बँक ऑफ इंडिया व व्यवसाय मार्गदर्शक, श्रीराम पांडे (आयआयटी खरगपूर) शाखाधिकारी नारायणा अकॅडमी नागपूर व श्री.राजू पाटील (बीटेक, एनडीए) माजी राष्ट्रीय सुरक्षा अकादमी अधिकारी असे विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी सावनेर व परिसरातील एसएससी, एचएससी परीक्षा उत्तीर्ण इच्छुक विद्यार्थी स्नातक, स्नातकोत्तर विद्यार्थी यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेच्या वतिने करण्यात येत आहे.